करनजीत कौर कशी बनली सनी लिओनी? बायोपिकमधून उलगडणार जीवनप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 03:02 PM2018-04-23T15:02:57+5:302018-04-23T16:00:20+5:30

'जिस्म - 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री सनी लिओनी लवकरच आपल्या खासगी आयुष्यासंबंधी काही गोष्टी जगासमोर मांडणार आहे. सनीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’असे या सिनेमाचे नाव असून शुटिंगसाठी ती सध्या साऊथ आफ्रिकेत पोहोचली आहे.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी सनी पॉर्न इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा होती. 2011 साली ती बिग बॉस-5 मध्ये दिसली होती. यानंतर सनी प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बॉसनंतर सनीनं महेश भट्ट यांचा 'जिस्म-2' सिनेमा साईन केला.

यानंतर सनीची जादू बॉलिवूडमध्येही पसरली. आयुष्याचा हा प्रवास वेब सीरिजच्या माध्यमातून मांडण्याची तिची इच्छा आहे.

बायोपिक येणार असल्यानं प्रचंड उत्साही असल्याचे सनीनं म्हटलंय.

दरम्यान, बायोपिकमध्ये सनीच्या आयुष्यातील कोणकोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.