ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन, सर्वसामान्य जनतेची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 03:37 PM2017-10-17T15:37:45+5:302017-10-17T15:41:36+5:30

वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी(16ऑक्टोबर) मध्यरात्री पुकारला बेमुदत संप

सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून काम बंद आंदोलन

ऐन दिवाळीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल, विविध एसटी कामगार संघटनांचा संपाला पाठिंबा

मुंबईतील परळ आणि पुण्याच्या स्वारगेट आगारातून एकही एसटी बाहेर पडली नाही

कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण, कागलमध्ये एसटीवर दगडफेक

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुण्यामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला

अकोल्यात ST बस संपाला कर्मचा-यांचा 100% प्रतिसाद

सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत