केंद्र सरकारविरोधात राज्यात निदर्शने, ठिकठिकाणी बंद अन् घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 11:14 AM2020-12-08T11:14:39+5:302020-12-08T13:49:39+5:30

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातही भाजपा वगळता इतर विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत बंद पुकारला असून केंद्र सरकारविरोधी निदर्शने नोंदवली आहेत.

विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. जामनेर येथे सर्व दुकाने बंद आहेत. अमळनेर येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी रॕली काढून बंदचे आवाहन केले.

सानपाडा ट्रक टर्मिनल येथील ट्रकचालकांनाही आपल्या गाड्या जागेवरच लावल्या असून भारत बंदला पाठिंबा दिला आहे

ठाण्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला आहे

ठाणे येथील कोपरी तसेच जांभळी नाका येथील मार्केट, तसेच कोपारित असणारी मार्केटमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कृषीमंत्री तोमर यांचे पुतळ्याचे तिरडी आंदोलन करण्यात आले

लालबाग येथे कम्युनिष्ट मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, भारत बंदमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला

मानखुर्द येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत, शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीनेही राज्यभरात पाठिंबा दर्शवला आहे