JNU वरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने; तरुणांचा मोदी सरकारविरोधात आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:19 PM2020-01-06T21:19:48+5:302020-01-06T21:22:25+5:30

कोलकाता येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन जेएनयू हल्ल्याचा निषेध नोंदवला.

जेएनयू विद्यापीठातील हल्ल्याप्रकरणी देशभरात विविध भागात आंदोलन करण्यात आलं, मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे सकाळपासून तरुणांनी एकत्र जमत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.

जेएनयूच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानवी साखळी तयार करत हल्ल्याचा निषेध नोंदवला.

दिल्लीतील इंडिया गेटसमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टॉर्च रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

तामिळनाडू येथे कॅंडल मार्च काढत जेएनयूवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.