रंग उडवू चला गड्यांनो रंग उडवू चला, होळीला रंगांची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 04:17 PM2019-03-21T16:17:11+5:302019-03-21T16:48:26+5:30

दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात रंगपंचमी साजरी केली जाते, पण रंगपंचमी साजरा करण्याचा ट्रेंड काही वर्षात हळूहळू बदलायला लागला आहे.(सर्व छायाचित्रः सुशील कदम)

रंगपंचमीऐवजी धुलीवंदन साजरा करण्याकडे तरुणाईचा कल वाढत चालला आहे.

या होळीला रंगांमध्ये न्हाऊन निघालेल्या तरुणाईलाही सेल्फी घेण्याचा मोह आवरता आलेला नाही.

रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे, झिंग झिंग झिंगाट, अशा हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाईनं ठेका धरला.

तिरंग्याच्या रंगात तरुण-तरुणींनी न्हाऊन निघत सेलिब्रेशन केलं.

रंगपंचमीनिमित्त तरुणाई रंगांमध्ये रंगलेली होती, तसेच अनेक तरुण ट्रिपल सीट रस्त्यावरून बाईकवरून जात होते.

रंगपंचमीसाठी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता, त्यावेळी पोलीस ड्रंक अँड ड्राइव्हची तपासणी करताना पाहायला मिळत होते.

टॅग्स :होळीHoli