Join us  

सात महिन्यांनंतर मोनो रेल धावली; आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल

By कुणाल गवाणकर | Published: October 18, 2020 3:56 PM

1 / 9
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर जवळपास सात महिन्यांनंतर मोनो रेलची सेवा सुरू झाली आहे.
2 / 9
कोरोनामुळे लागलेल्या ब्रेकनंतर आज अखेर मोनो रेल धावली. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक मार्गावर मोनोरेल आजपासून सुरू झाली.
3 / 9
मोनोरेलमध्ये सर्वांना प्रवेश असणार आहे. त्यामुळे बस सेवेवरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
4 / 9
शनिवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनीदेखील मोनोरेल सुरु करण्यापूर्वीच्या कामाची पाहणी केली.
5 / 9
राजीव यांनी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा मोनोरेलने प्रवासदेखील केला.
6 / 9
क्यूआर स्कॅनिंगची पाहणी करत कोरोना काळात प्रवास करताना प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
7 / 9
सुरुवातीला मोनोच्या दिवसाला १०० फेऱ्या होतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढवण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.
8 / 9
मोनो रेल प्रशासनाला सेवा सुरू करण्याची परवानगी १५ ऑक्टोबरला देण्यात आली.
9 / 9
कोरोना संकट येण्यापूर्वी मोनोरेलच्या दिवसभरात ११५ फेऱ्या होत होत्या. त्यातून ८०० प्रवासी प्रवास करत होते.
टॅग्स :Mono Railwayमोनो रेल्वे