'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:29 PM2018-09-23T17:29:43+5:302018-09-23T17:51:16+5:30

मुंबईत गेल्या 10 दिवसापासून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली होती, तर आज विसर्जन मिरवणुकीतही तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

ढोल ताशाचा गजर, गुलालाची उधळण अन् भक्तांच्या गर्दीत लालबागच्या राजाची पालघी निघाली

पुढच्या वर्षी लवकर या.... या गजरात मुंबईकरांनी हजारोंच्या संख्येने लालबागच्या राजाला निरोप देण्यास सुरुवात केली आहे.

जगभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजाची वसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गावाकडूनही मंडळी खास मुंबईत आली आहे, लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त

गुलाल अन् भंडाऱ्याची उधळण, गणेशभक्तांची तोबा गर्दी अन् तरुणाईची सेल्फी काढण्यासाठी धडपड..

10 दिवसांपासून ज्या बाप्पांची मनोभावे पूजा केली, आरती केली, काळजी घेतली अन् राजासाठी धक्काबुक्कीही केली. त्या लाडक्या राजाला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाले आहेत. पण मनात आस आहे ती... पुढच्या वर्षी लवकर या...

पोलिसांचा कडक बंदोबस्त, भक्तांची गर्दी, तरीही शिस्तबद्ध आणि देखणा विसर्जन सोहळा