'केंद्रानं पॅकेज दिलं नसतं तर, कोरोनापेक्षा भूकबळीनं जास्त लोकं दगावले असते'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:08 PM2021-03-30T15:08:18+5:302021-03-30T15:26:21+5:30

कामगार आणि धुणी-भांडी करणाऱ्या माझ्या माता-भगिनींच्या पोटा पाण्याचा प्रश्न उद्धवतो. दररोज हातगाडी लावून विकणाऱ्यांची उपासमार होते. लॉकडाऊन काळात आपण हे पाहिलं आहे. जर 'केंद्र सरकारनं पॅकेज दिलं नसतं तर, कोरोनापेक्षा भूकबळीनंच जास्त लोकं मेली असती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

राज्य शासन सर्वसामान्यांना एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही़ मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य शासन जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार, असा टोला पाटील यांनी लगावला.

कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने एक रुपयांचे पॅकेज जाहीर केले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही.

गेल्या दोन तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल तर त्याला आमचा विरोध असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे.

लॉकडाऊन लागू केले तर त्याचा सर्वाधिक फटका हा असंघटित वर्गालाच बसेल. त्यामुळे त्यांनी अगोदार असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणार्‍यांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

लॉकडाऊनला आमचा विरोधच आहे. राष्ट्रवादी अन् मनसेचाही लॉकडाऊला विरोध असेल तर हीच लोकशाही आहे. लोकांच्या हितासाठीच्या मुद्दयावर सर्वजण एकत्र येतात. लॉकडाऊन लागल्यानंतर गोरगरीब आणि मजूरांचे हाल होतात.

कामगार आणि धुणी-भांडी करणाऱ्या माझ्या माता-भगिनींच्या पोटा पाण्याचा प्रश्न उद्धवतो. दररोज हातगाडी लावून विकणाऱ्यांची उपासमार होते. लॉकडाऊन काळात आपण हे पाहिलं आहे.

जर 'केंद्र सरकारनं पॅकेज दिलं नसतं तर, कोरोनापेक्षा भूकबळीनंच जास्त लोकं मेली असती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पाटील आले होते, त्यावेळी विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही

विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे.

त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले

मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर राज्यातील विरोधी पक्षाने लॉकडाऊनला आपला विरोध असल्याचं म्हटलंय.

चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला आमचा विरोथ असल्याचं म्हटलं, तसेच गोरगरिबांनाच याचा सर्वाधीक फटका बसतो, असेही पाटील म्हणाले