हिमांशू रॉय यांचं 'बॉडी बिल्डिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 05:51 PM2018-05-11T17:51:49+5:302018-05-11T17:51:49+5:30

जिमची मनापासून आवड असल्याने स्वत:चे शरीर फिट राखणारे हिमांशू रॉय मनानेही तसेच फिट होते.

हिमांशू रॉय हे पत्रकारांनाही भेटल्यावर त्यांना व्यायाम व डाएटचे महत्त्व समजावून सांगत.

सामान्य पोलीस शिपायापासून प्रत्येकाशी आपुलकीने वागणाऱ्या या अधिकाऱ्य़ाने अकाली आपले जीवन संपवल्याने अवघ्या पोलीस दलातच नाही तर सर्वत्रच हळहळ व्यक्त होते आहे.

प्रत्येक प्रकरणाच्या तपासाकडे वैयक्तिक लक्ष पुरवणारा हा अधिकारी कोणत्याही प्रकरणात दबावाला न जुमानता तपास करत असे.

मध्यंतरीच्या काळात त्यांना वादातही ओढण्याचा प्रयत्न झाला तरी न डगमगता ते शांतपणे सामोरे गेले.

२०१४ साली मुंबईच तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह हिमांशू रॉय यांना z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली.