मुसळधार पावसाने मुंबईत धुमशान, पाणी तुंबले, वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 09:03 PM2018-06-04T21:03:11+5:302018-06-04T21:03:11+5:30

मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी आज संध्याकाळी मुंबई आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली.

पावसाच्या या सरींमुळे शहरातील रस्ते आणि लोकल रेल्वे वाहतूक मंदावली.

मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणी तुंबले.

पावसाबरोबर वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड पडल्याने एका कारचे नुकसान झाले.

मात्र या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला.