Gold Rate Today: सोन्याचा दर पुन्हा वाढला, चांदीच्या किंमतीतही वाढ; काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 06:25 PM2021-10-14T18:25:24+5:302021-10-14T18:33:03+5:30

सोन्याच्या किमतीमध्ये आज जोरदार तेजी दिसून आली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचली आहे.

सोन्याच्या किमतीमध्ये आज जोरदार तेजी दिसून आली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत 455 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानीत 99.9 टक्के ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार रुपयांच्या जवळ पोहोचली. आज दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 46,987 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली.

सोन्यासोबतच आज चांदीच्या किमतीतही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदी 62 हजार रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या व्यापार सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 46,532 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 61,032 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. तर चांदीच्या किमतीत कोणताही विशेष बदल झालेला नाही.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.