रजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 03:54 PM2018-06-07T15:54:45+5:302018-06-07T15:54:45+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांना ट्रेंड सेटर आणि स्टाईल आयकॉन मानलं जातं. प्रत्येक सिनेमामध्ये रजनीकांत हटके स्टाईल ट्रेंड सेट करतात आणि चाहत्यांच्या मनावर याची छापदेखील पडते.

बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या काला सिनेमातही त्यांनी एक अनोखी स्टाईल सेट केली आहे. काला सिनेमामध्ये रजनीकांत यांनी 'सनग्लासेस' वापरण्याचा अनोख ट्रेंड सेट केला आहे. रजनीकांत यांच्या गॉगल्सची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा आहे.

रजनीकांत यांच्या पूर्वीच्या सिनेमांतील सिग्नेचर स्टाईलसंदर्भात बोलायचे झाले तर एका विशिष्ट पद्धतीनं रुमाल किंवा शाल खांद्यावर ठेवण्याची त्यांची स्टाईल प्रेक्षकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे.

'शिवाजी द बॉस' सिनेमामधील 1 रुपयाचं नाणं हवेत उडवण्याचा रजनीकांत यांचा सीन आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. नाणं हवेत उडवून बोटांनी त्यासोबत खेळण्याचा सीन मोठ्या प्रमाणात हीट झाला होता.

रजनीकांत यांनी कित्येक हिंद आणि तमिळ सिनेमांमध्ये सिगारेट अथवा बीडीला अनोख्या अंदाजात तोंडामध्ये ठेवताना पाहिलं गेले आहे. त्यांची ही सिग्नेचर साईन आजही प्रचंड फेमस आहे.

सिगारेटसोबत च्युईंग गम खाण्याचीही त्यांनी हटके स्टाईल कित्येक सिनेमांमध्ये पाहायला मिळाली आहे.