Pooja Chavan Case: आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याची नवी माहिती समोर; प्रकरणाला आता वेगळंच वळण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 10:48 AM2021-08-04T10:48:53+5:302021-08-04T10:53:06+5:30

Pooja Chavan Case: पुणे पोलिसांच्या हाती आलेल्या पुजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला भरपूर दिवस होऊन गेले आहेत तसेच या आत्महत्या प्रकरणावरुण पूजाच्या घरच्या मंडळींनी संजय राठोड यांना क्लिनचिट सुध्दा दिली आहे. मात्र पुणे पोलिसांच्या हाती आलेल्या पुजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पूजा चव्हाणच्या वैद्यकीय अहवालामध्ये तिच्या मानेला मार लागला होता. तर तिच्या शरीरामध्ये अल्कोहोल असल्याची धक्कादायक बाब केमिकल अँनालायसेस अहवालात नोंद करण्यात आली आहे. या अहवालामुळे इतक्या दिवस शांत असणार प्रकरण पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलं आहे.

व्हिसेरा रिपोर्टमध्ये पूजाने आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याचेही निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेत तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.तसेच हा अहवाल प्राप्त झालीच्या माहिती पोलीसांनी दिली असून या प्रकरणाचा योग्य तपास सुरू असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

तत्पूर्वूी, पूजा चव्हाण हिची आत्महत्या होण्यापूर्वी तिचा आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते. या संभाषणातील एक आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा अहवाल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला होता. याला पुणे पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिला असून हा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच मिळाल्याचे सांगितले आहे.

आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात ९० मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना फॉरेन्सिक अहवालात देण्यात आला आहे. पूजाच्या आत्महत्येपूर्वी सुमारे ९० मिनिटे पूजा हीच संजय राठोड यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याची माहिती समोर आली आहे. हे संभाषण वंजारा भाषेत होते.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तांत्रिकदृष्ट्या तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती. सुरुवातीला १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यातील दोन व्यक्तीमधील संभाषणात पूजा चव्हाणबरोबर बोलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हा संजय राठोड यांचा असल्याचा वृत्ताला फॉरेन्सिक अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे.