CAA विरोधात मुंबईत एल्गार; संविधानाचा जयजयकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 06:31 PM2019-12-19T18:31:49+5:302019-12-19T18:45:17+5:30

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरू आहे. मोदी-शाहांविरोधात नारे देत धर्माधर्मांत भेद करणारा कायदा मागे घेण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाचं लोण देशाच्या विविध राज्यांमध्ये पसरताना दिसतंय.

ईशान्य भारतात एनआरसी आणि सीएए विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाचे दिल्लीतही तीव्र पडसाद उमटत आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे.

आज मुंबईत विविध संघटनांनी सीएएविरोधात एल्गार केला. यात मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहेच, पण विद्यार्थी आणि महिलाही आंदोलनात पुढे आहेत.

'तानाशाही नही चलेगी'च्या घोषणांनी ऑगस्ट क्रांती मैदानाचा परिसर दणाणून गेला.

ऑगस्ट क्रांती मैदान हाऊसफुल्ल (फोटोः दत्ता खेडेकर)

(फोटोः सचिन लुंगसे)

तुम्हारी लाठी से तेज हमारी आवाज है...