कुठे मोबाईलचे फ्लॅश, तर कुठे मदतीचे हात; मुंबईत अचानक बत्ती गुल होते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 04:02 PM2020-10-12T16:02:37+5:302020-10-12T17:48:56+5:30

मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाले. मात्र वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर मुंबई अगदी ठप्पचं झाली होती. (सर्व फोटो- सुशील कदम)

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णालयालाही ह्याचा फटका बसला. पण सायन रुग्णालयात डॉक्टर रुग्णवर मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात रूग्ण सेवा करत बजावत होते.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सायन व आसपासच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सायन येथील भुयारात अंधार झाल्याने नागरिक मोबाईल बॅटरीचा वापर करत चालत होते.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लोकल सेवेला देखील फटका बसला. वीज नसल्यामुळे सर्व लोकलही जागच्या जागी उभ्या होत्या.

वीज गेल्याच्या काही वेळेनंतर काही नागरिकांनी रेल्वे रुळावरुन चालत जाण्यास पसंत केले.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लोकल बंद असल्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा बेस्ट बसकडे वळविला.

सव्वा दोन तासांनी हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरु झाली. यानंतर मध्य रेल्वेवरील लोकल सेवाही सुरु झाली. काही वेळा पूर्वी पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवाही सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.