'पुष्पा'फेम दक्षायणी खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पाहा तिचा रिअल लाइफ रावडी लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 03:54 PM2022-01-23T15:54:22+5:302022-01-23T16:00:10+5:30

Ansuya bharadwaj : अनुसुयाला या चित्रपटात स्क्रीन टाइम जरी कमी मिळाला असला तरीदेखील तिने साकारलेल्या भूमिकेमुळे अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याची मुख्य भूमिका असलेला पुष्पा हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला.

तेलुगू,मल्याळम, तमिळ आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. परंतु, यातील एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधूनच घेतलं नाही. तर तिच्यावर प्रेक्षकांच्या नजराही खिळवून ठेवल्या.

रश्मिका मंदानाप्रमाणेच या चित्रपटातील आणखी एक अभिनेत्री चर्चेत आली ती म्हणजे अनुसुया भारद्वाज.

अनुसुयाने पुष्पामध्ये मंगलम श्रीनुच्या पत्नीची म्हणजेच दक्षायणी हिची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटातील तिचा रावडी लूक, दादागिरीची भाषा आणि बिंधास्तपणा यामुळे ती चर्चेत आली.

अनुसुयाला या चित्रपटात स्क्रीन टाइम जरी कमी मिळाला असला तरीदेखील तिने साकारलेल्या भूमिकेमुळे अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

पुष्पाच्या हिंदी व्हर्जनमध्ये दक्षायणीच्या भूमिकेसाठी सबीना मौसम यांनी आपला आवाज दिला आहे.

दक्षायणीची भूमिका साकारणारी अनुसुया खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

अनुसुया सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.