खामोश गर्ल सोनाक्षी सिन्हाचा बिंधास्त अंदाज, लेटेस्ट फोटोंतून चाहत्यांना केले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 07:01 PM2019-04-12T19:01:10+5:302019-04-12T19:03:52+5:30

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या आगामी चित्रपट कलंकच्या प्रमोशनमुळे बिझी आहे. मात्र बिझी शेड्युलमधूनदेखील वेळ काढत सोनाक्षीने लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सोनाक्षी सिन्हाचा कलंक चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त व माधुरी दीक्षित दिसणार आहे.

सोनाक्षीच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये सेक्सी व ग्लॅमरस दिसते आहे.

कलंक व्यतिरिक्त सोनाक्षी दबंग ३च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

दबंग ३ चित्रपटातून पुन्हा एकदा सोनाक्षी व सलमान खान ही जोडी रसिकांना रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे.

नुकतेच सोनाक्षीने अजय देवगण, अनिल कपूर व माधुरी दीक्षित यांचा प्रदर्शित झालेला चित्रपट टोटल धमालमध्ये मुंगडा हे आयटम साँग केले होते. या गाण्याला खूप चांगली दाद मिळाली होती.

शेवटची सोनाक्षी हॅप्पी फिर भाग जायेगी चित्रपटात जिमी शेरगिल, डायना पेंटीसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.

हॅप्पी फिर भाग जायेगी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही.