भाऊ कदमच्या 50 व्या वाढदिवसाचे अनोखं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:13 AM2020-03-03T11:13:43+5:302020-03-03T11:36:12+5:30

आज भाऊ कदम त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम ; आणि रसिकांचा लाडका भाऊ कदम

नेहमीच इतरांच्या चेह-यावर हसू फुलवणा-या भाऊ कदमसाठी त्याच्या मित्र परिवाराने त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी दिली

भाऊच्या 50 व्या वाढदिवसाचे कुटुंबासह जवळच्या नातेवाईक मित्रांसह त्याने त्याचा हा खास दिवस साजरा केला.

वाढदिवसानिमित्त भाऊवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

ढोला ताशाचा गजरात त्याचा वाढिदवस साजरा करण्यात आला

फॅन्ससह सेलिब्रिटींकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत

सा-यांकडून मिळालेले हे प्रेम पाहून भाऊ खूपच भारावला होता