उफ्फ तेरी अदा, पाठमोरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना केले घायाळ, SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 02:34 PM2021-02-23T14:34:36+5:302021-02-23T14:43:36+5:30

सोशल मीडियावर तेजस्विनी पंडित नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

तेजस्विनी पंडितने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अलिकडेच निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे.

तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

पाठमोरा फोटो शेअर करत सा-यांनाचा आश्चर्याचा धक्काच दिला आहे.

शेअर केलेल्या फोटोत मानेवरील तिच्या टॅटूने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोवर चाहते भरपूर लाईक्स आणि कमेंटस देत आहेत.

अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देवून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

चाहत्यांकडून तिच्या या ग्लॅमरस लुकचं कौतुक होत आहे.

तेजस्विनीची हा लुक खूपच व्हायरल होत आहे. ती नेहमी तिचे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते.