वहिनीसाहेबांच्या बेबी शॉवरचे झक्कास फोटो, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 01:18 PM2021-01-10T13:18:10+5:302021-01-10T13:35:25+5:30

धनश्री काडगावकरने शेअर केलेत बेबी शॉवरचे फोटो

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी या व्यक्तीरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे.

आता धनश्रीने तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत आणि तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पतीच्या वाढदिवसाच्याच दिवशी धनश्रीने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ही गुड न्युज शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला होता.

बेबी शॉवरच्या या फोटोंमध्ये धनश्रीच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.

बेबी शॉवरसाठी धनश्रीने लाईट ब्ल्यू कलरचा गाऊन निवडला होता.

धनश्री सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी धनश्रीने डोहाळे जेवणाचे काही फोटो शेअर केले होते.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते.

धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

दासबाबू दिग्दर्शित ‘ब्रेव्हहार्ट’ या चित्रपटातून धनश्रीची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. याचवर्षी रिलीज झालेल्या या चित्रपटात अभिनेता संग्राम समेळसोबत धनश्री झळकली होती. शिवाय तिचा ‘चिठ्ठी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.