हे फोटोज् पाहून विश्वास बसणार नाही 46 वर्षांची आहे सोनाली कुलकर्णी, दिसते फारच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:00 AM2021-06-03T06:00:00+5:302021-06-03T06:00:00+5:30

अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.

मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे.

या वयातही सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.

तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण आहे. सोनालीला सायकलिंगची आवड आहे.

ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे.

ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते.

आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा देणारे असतात.

इतरांनाही यातून प्रेरणा मिळावी म्हणून स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

दररोज सकाळी साडेचार वाजता उठून ती दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि 20-25 किमी सायकलिंग करते.

सुट्टीच्या दिवशी पण सोनाली आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.