कधी बिकनीतील बोल्ड लूक तर कधी नवऱ्यासोबत लिपलॉक, सोनाली कुलकर्णीच्या तिसऱ्या हनीमूनची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:33 PM2022-05-18T16:33:33+5:302022-05-18T16:50:38+5:30

Sonalee Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नवरा कुणालसोबत हनीमूनसाठी मॅक्सिकोत गेली आहे.

सोनाली कुलकर्णीनं लग्नाचा पहिला वाढदिवस नुकताच झाला. या दिवशी सोनालीने पती कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.

या लग्नाला सोनाली आणि कुणालच्या घरातील मंडळी आणि तिची मैत्रिण प्रार्थना बेहरेदेखील उपस्थित होती.

दुसऱ्या लग्नानंतर सोनाली आणि कुणाल तिसऱ्या हनीमूनसाठी मॅक्सिकोमध्ये गेले आहेत. तिथले फोटो सोनालीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या फोटोत ती बीचवर कुणालसोबत लिपलॉक करताना दिसते आहे.

हनीमूनमध्ये सोनाली कुलकर्णीचा बिकनीतील बोल्ड लूकदेखील चर्चेत आला आहे.

सोनाली कुलकर्णीचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनालीने मागील वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.

७ मे २०२२ रोजी सोनाली आणि कुणालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. हेच औचित्य साधून त्यांनी याच दिवशी विधिवत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

सोनालीचा नवरा कुणाल दुबईत वास्तव्याला असतो. त्याचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात.