थेट कतार...!! कार्तिकी गायकवाडचं परदेशातलं झक्कास फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 05:56 PM2021-12-02T17:56:36+5:302021-12-02T18:03:38+5:30

Kartiki Gaikwad : कतारच्या समुद्रकिना-यावर कार्तिकने फोटोशूट केलं आहे. एकापेक्षा एक ग्लॅमरस पोजमधील तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाड हे नाव घराघरात पोहोचलं. आता या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आज कार्तिकी मराठी फिल्म इंडस्ट्रीची मोठी गायिका आहे.

तूर्तास काय तर कार्तिकीच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. होय, तेही थेट परदेशातलं फोटोशूट.

कार्तिकीने स्वत:चे परदेशातील समुद्रकिना-यावरचे फोटो शेअर केले आहेत. कॅमे-याला झक्कास पोझ देतानाचे कार्तिकीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

कतारच्या समुद्रकिना-यावर नुकताच कार्तिकीच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच दुस-या देशात म्हणजे कतारला जाऊन तिने वाळवंटी दिपमेळा या कार्यक्रमात सुरेल परफॉर्मन्स दिला.

याच कतारच्या समुद्रकिना-यावर कार्तिकने फोटोशूट केलं आहे. एकापेक्षा एक ग्लॅमरस पोजमधील तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सा रे ग म प लिटील चॅम्प्सच्या नव्या पर्वात कार्तिकी गायकवाड परिक्षक म्हणून झळकतेय. विशेष म्हणजे, या शोच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी आहे.

गायिका कार्तिकी गायकवाड हिने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केलं. सध्या कार्तिकी वैवाहिक आयुष्यासोबत करिअर सांभाळतेय.