सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली मयेकर खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा अभिनेत्रीचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 07:00 AM2021-03-21T07:00:00+5:302021-03-21T07:00:00+5:30

मिताली मयेकरचे ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

मिताली मयेकरने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

मिताली मयेकर ब्लॅक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.

मिताली मयेकरचा ब्लॅक ड्रेसमधील अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.

तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मिताली मयेकरचा नुकताच हॅशटॅग प्रेम हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता.

तसेच मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील लाडाची मी लेक गं या मालिकेत काम करताना दिसते आहे.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर गेल्या २४ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.