मलमली तारुण्य माझे,श्रुती मराठेच्या या फोटोवर नेटकरी फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:09 PM2021-06-09T16:09:03+5:302021-06-09T16:25:51+5:30

छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने अभिनेत्री श्रृती मराठेने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत.

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

श्रुती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल.

श्रुतीचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो.

या फोटोमध्ये श्रुतीचा स्टायलिश अंदाज तुम्हाला आकर्षित करेल.

श्रुतीचे हे फोटो साऱ्यांसाठी लक्षवेधी ठरत आहे.

तिच्या चेहऱ्यावरील हास्य घायाळ करणारं असंच म्हणावं लागेल.

तिच्या या फोटोवर फॅन्स आणि नेटिझन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.

साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.