नेहा पेंडसेची स्टाइल 'लय भारी' पाहा तिची 'अदाकारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:44 PM2020-08-18T13:44:20+5:302020-08-18T13:55:30+5:30

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते.

सोशल मीडियावरही तितकीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहा आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजात रसिकांना घायाळ करणारी नेहाची प्रत्यक्ष जीवनातही आपल्या मादक अदांची जादू पाहायला मिळते.

नेहा आपले ग्लॅमरस अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते.

नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर यामुळे नेहाची बरीच चर्चा रंगते.

मराठीबरोबरच हिंदीमध्ये 'मे आय कमिंग मॅडम' नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये 'प्रेझेंटर'म्हणून झळकली होती.

नेहाने आजवर मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे.

नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती.

वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी ती फिटनेस टीप्सही शेअर करत असते.

नेहा अभिनयासोबतच पोल डान्सही उत्तम करते. पोल डान्सचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.

वेस्टर्न आऊटफिटप्रमाणेच पारंपरिक अंदाजातही नेहा खूप सुंदर दिसते.