‘अश्लील उद्योग मित्र मंडळा’तील 'सविता भाभी'मुळे पेटला वाद, जाणून घ्या A to Z माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 12:16 PM2020-03-06T12:16:32+5:302020-03-06T13:36:30+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'अश्लील उद्योग मित्र मंडळा'तून 'सविता भाभी' बाहेर पडली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात विविध ठिकाणी 'सविता भाभी... तू इथंच थांब !!' या मजकूराचे फ्लेक्स सर्वत्र लागले होते. हा फ्लेक्स म्हणजे सिनेमाच्या प्रमाशेनची क्लुप्ती होती.

गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमातील सविता भाभी या पात्राला घेऊन अनेक वाद होताना दिसतायेत. आता दिग्दर्शकांना सविता भाभी या भूमिकेला तडीपार करावे लागणार आहे

आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिका वठवत असून ती सविता भाभी ही व्यक्तीरेखा साकारत आहे.

सई ताम्हणकर या चित्रपटात सविता भाभीची व्यक्तीरेखा साकारत आहे.

या चित्रपटाच्या हटके प्रमोशनबाजीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र यातील सविता भाभीमुळे निर्मात्यांना नोटीस धाडण्यात आली

त्यामुळे त्यांनी अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमाच्या निर्मात्यांना याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली होती.

'सविता भाभी' या काल्पनीक पात्राचे कॉपीराइट आपल्याकडे आहेत, कॉपीराईट माझ्याकडे असतानाही निर्मात्यांनी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही असे निलेश गुप्ता यांचे म्हणणं होतं.

त्यानुसार सिनेमात ज्या ठिकाणी सविता भाभीच्या नावाचा उल्लेख आहे तो काढावा लागणार आहे.

६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.