रिंकू राजगुरुने लूकवर घेतली इतकी मेहनत पूर्वीपेक्षाही दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 10:40 AM2021-01-05T10:40:05+5:302021-01-05T10:46:47+5:30

सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. रातोरात स्टार बनलेली रिंकूच्या लूकमध्येही बदल झाला आहे. वर्कआऊट योग्य डाएट फॉलो करत रिंकू आता फॅट टू फिट बनली आहे.

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.

तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता.

ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक रिंकूच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे.

त्यानंतर रिंकूने पुन्हा एकदा इन्डो वेर्स्टन लूकमधला फोटो शेअर केला आहे. त्याचा हा लूक नेहमी प्रमाणे तिच्या फॅन्सना भावला आहे.

सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे.

सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल.

गावरान अंदाजातील रिंकूचा जणू काही कायापालट झाल्याचे तुम्हाला तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल.

इन्स्टापेजवर नजर टाकाल तर तुम्हाला तिच्या विविध ग्लॅमरस अदा पाहायला मिळतील.