जाळीदार ड्रेसमध्ये सई ताम्हणकरने केलं फोटोशूट; Photo पाहून चाहतेही घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:40 PM2021-09-29T18:40:00+5:302021-09-29T18:40:00+5:30

saie tamhankar 'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून कायमच सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं.

उत्तम अभिनयासोबतच सई अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.

'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती.

अलिकडेच सईने एक नवीन फोटोशूट केलं असून तिचे काही फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

सईने पांढऱ्या रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये सईच्या चेहऱ्यावरील अॅटीट्यूड जास्त लक्षवेधी ठरत आहे.

प्रत्येक फोटोसाठी सईने खास पोझ दिल्या असून त्यात तिचा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड दिसून येत आहे.

कधी हटके फोटोशूट तर कधी एखाद्या चित्रपटातील भूमिका अशा विविध माध्यमातून सई कायमच चर्चेत येत असते

सईने छोट्या पडद्यापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.