आली लहर केला कहर, रिंकू राजगुरुचे फोटो पाहून हटणार नाही नजर !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:26 PM2021-11-30T12:26:10+5:302021-11-30T12:31:00+5:30

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे आगामी प्रोजेक्टसविषयी चाहत्यांना अपडेट देत असते.

गेल्या काही दिवसांपासून रिंकू तिच्या लूकवर प्रचंड मेहनत घेत आहे.

सध्या ती तिच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय.

वर्कआऊट दरम्यानचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोत तिचा बदललेला लूक चाहत्यांच्या लक्ष वेधून घेत आहे.

तिचे फोटो पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडत आहेत.

रिंकूला मराठीतली दिशा पटानी म्हणूनही चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

तसेही तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो.

त्यामुळे पारंपरिक असो किंवा वेस्टर्न चाहते तिच्या लूकवर फिदा नाही झाले तरच नवल.

सैराटनंतर रिंकूचा झालेला कायापालट पाहून चाहतेही तिचे भरभरुन कौतुक करत असतात.