साडीत खुलून आलंय प्राजक्ता माळीचे सौंदर्य, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 06:35 PM2021-02-11T18:35:15+5:302021-02-11T18:52:47+5:30

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.

प्राजक्ताने हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिचे साडीतले अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

प्राजक्ता साडीत खूपच छान दिसते असे तिचे फॅन्स तिला नेहमीच कमेंटच्या माध्यमातून सांगत असतात.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

प्राजक्ताला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलो करतात.