PHOTOS: अभिज्ञा भावेच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 02:30 PM2021-01-05T14:30:27+5:302021-01-05T14:41:09+5:30

अभिज्ञा भावेची नुकतीच मेहंदी सेरेमनी पार पडली.

अभिनेत्री अभिज्ञा भावे लवकरच मेहूल पैसोबत लग्नबेडीत अडकणार आहे.

नुकतीच अभिज्ञा भावेची मेहंदी सेरेमनी पार पडली.

अभिज्ञा भावेच्या मेहंदी सेरेमनीचा फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या मेहंदी सेरेमनीला अभिज्ञा भावेचे सिनेइंडस्ट्रीतील जवळचे मित्र मैत्रीणींनी हजेरी लावली होती.

यात श्रेया बुगडे, तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे, मयुरी देशमुख असे बरेच कलाकार उपस्थित होते.

सूत्रांच्या माहितीनुसार अभिज्ञा भावे आणि मेहूल पै ७ जानेवारीला लग्नबेडीत अडकणार आहेत.

अभिज्ञा भावेचा मेहूल पैसोबत ऑक्टोबर २०२०मध्ये साखरपुडा पार पडला होता.

मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून 'क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.