मराठमोळ्या केळीवालीचे फोटो झाले व्हायरल, सोनाली कुलकर्णीच्या या लूकला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 09:25 PM2021-11-27T21:25:43+5:302021-11-27T21:36:23+5:30

सोनाली कुलकर्णी एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

सोनाली कुलकर्णी पांडू या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिने उषा केळेवालीची भूमिका साकारली आहे.

सोनाली पांडू या चित्रपटातून वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पांडू चित्रपटात सोनाली कुलकर्णीसोबत भाऊ कदम मुख्य भूमिकेत आहे.

पांडू चित्रपट ३ डिसेंबरला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

याशिवाय सोनालीचा नुकताच झिम्मा हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे.

झिम्मा चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

सोनाली कुलकर्णी याशिवाय बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सोनाली कुलकर्णीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.