नवे जोडपे समुद्र किनारी दिसले रोमँटिक मूडमध्ये, पहा अभिज्ञा भावे आणि मेहुल पैचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:40 AM2021-01-13T11:40:04+5:302021-01-13T11:48:32+5:30

अभिज्ञा भावे आणि मेहुल पैचे नवीन फोटो आले समोर

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही तिचा बॉयफ्रेंड मेहूल पैसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

त्यांच्या लग्नाचे फोटो अभिज्ञाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून त्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

तिच्या लग्नाचे अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दरम्यान, आता अभिज्ञा भावे आणि मेहुल पैचे समुद्र किनारी रोमँटिक मूडमधील फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

या फोटोंमध्ये अभिज्ञा आणि मेहुल या दोघांनी काळ्या रंगाचे आउटफिट घातले आहेत.

मकर संक्रातीच्या निमित्ताने हे फोटोशूट करण्यात आले आहे.

या फोटोंमध्ये दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

अभिज्ञा आणि मेहुलच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांचे फोटोशूट रॉयल तस्त (royaltasta)ने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.