"चाँद जैसे मुखडेपे सुरज भी लट्टू हो गया", मृणाल कुलकर्णीच्या फोटोवर चाहत्यांचा लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:17 PM2021-03-04T17:17:47+5:302021-03-04T17:34:53+5:30

रसिकांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयाने रुपेरी पडदा असो किंवा छोटा पडदा त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी.

आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय.

मृणाल कुलकर्णी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खुद्द मृणाल यांनीच त्यांचा हा फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना कॅप्शन सुचवण्यास सांगितले.

फोटो पाहून चाहत्यांनीही एक से बढकर एक कमेंट देत लाईक्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.

'माझा होशील ना' या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आणि अभिनेता विराजस कुलकर्णी घराघरात पोहचला आहे.

आजही त्या विशीतील तरुणींना लाजवेल एवढ्या सुंदर दिसतात.

मराठी इंडस्ट्रीतील देखण्या अभिनेत्रींमध्ये मृणाल यांची गणना होते.