खऱ्या आयुष्यात नेहाची वहिनी आहे प्रचंड ग्लॅमरस; जाणून घ्या तिच्या रिअल लाईफविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:02 PM2021-09-28T15:02:11+5:302021-09-28T15:11:26+5:30

Swati deval: ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘चल धर पकड’, ‘आम्ही सातपुते’, ‘वन टू का 4’, ‘असा मी असामी’ ,’कुंकू’, ‘वादळवाट’, ‘पुढचं पाऊल’ अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून स्वातीने विविधांगी भूमिका साकारल्या.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ.

या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. त्यामुळे ही मालिका लोकप्रिय होत आहे.

यश, परी, नेहा यांच्याप्रमाणेच सध्या लोकप्रिय होत असलेली व्यक्तीरेखा म्हणजे नेहाच्या वहिनी.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत मिनाक्षीची म्हणजेच नेहाच्या वहिनीची एण्ट्री झाली आहे.

प्रचंड बडबड आणि सतत नेहामागे लग्नाचा तगादा लावणारी मिनाक्षी लोकप्रिय होत आहे. त्यामुळेच या लोकप्रिय ठरत असलेल्या मिनाक्षीची रिअल लाईफ कशी आहे ते पाहुयात.

मिनाक्षीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव स्वाती देवल आहे.

स्वातीने अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे.

स्वाती देवलचा पतीदेखील कलाविश्वात सक्रीय असून तुषार देवल असं त्याचं नाव आहे.२६ ऑक्टोबर २००३ मध्ये स्वाती आणि तुषारने लग्न केले.

तुषार सध्या चला हवा येऊ द्यामध्ये काम करत असून तो उत्तम संगीत दिग्दर्शक व अभिनेता आहे.