दिवसेंदिवस 'फॅण्ड्री'तील शालू होतीये आणखीनच बोल्ड; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 11:30 AM2021-10-01T11:30:42+5:302021-10-01T11:42:30+5:30

Rajeshwari kharat: फॅण्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचं धगधगतं समाजवास्तव मांडण्यात आलं होतं.

नागराज मंजुळे यांचा 'फॅण्ड्री' चित्रपट आठवतोय का? अर्थात अनेकांना आठवत असेल. या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचं धगधगतं समाजवास्तव मांडण्यात आलं होतं. (सौजन्य : राजेश्वरी खरात इन्स्टाग्राम)

या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे हा चित्रपट आज अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

या चित्रपटातील कथानकासोबतच प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली जोडी म्हणजे जब्या आणि शालू.

या चित्रपटातील कथानकासोबतच प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली जोडी म्हणजे जब्या आणि शालू.

अभिनेता सोमानाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. सोमनाथने जब्याची भूमिका साकारली होती. तर, राजेश्वरीने शालूची.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्ष लोटली आहे. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांमध्येही कमालीची बदल झाला आहे.

शाळकरी मुलीची भूमिका साकारणारी राजेश्वरी आता प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे.

राजेश्वरीचा कलाविश्वातील वावर म्हणावा तसा नाही. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे.

राजेश्वरी बऱ्याचदा तिचे बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच तिने इन्स्टाग्राम काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.