PHOTOS: 'धर्मवीर' आनंद दिघेंचे पुन्हा एकदा सारथी झाले एकनाथ शिंदे; ग्रँड प्रिमियरला बुलेटवरुन कडक एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 11:17 AM2022-05-14T11:17:04+5:302022-05-14T11:59:38+5:30

धर्मवीरच्या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओकसोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेऊन सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला.

आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा बहुप्रतिक्षित सिनेमा 13 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Photo Instagram)

आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला प्रसाद ओकशिवाय अन्य कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. खरे वाटावेत असे दिघे प्रसादने सादर केले आहेत. (Photo Instagram)

देहबोली, संवादफेक आणि इतर बऱ्याच बारीकसारीक गोष्टींवर प्रसादनं अत्यंत बारकाईनं काम केलं आहे.(Photo Instagram)

या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी खास लोकग्रहास्तव चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओकसोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेऊन सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला. (Photo Instagram

या सिनेमाच्या ग्रँड प्रिमियर सोहळ्यासाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाण्यातील सर्व प्रमुख पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी, धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता क्षितिश दाते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(Photo Instagram)

ठाण्यातील व्हीव्हियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात ग्रँड प्रिमियर सोहळा संपन्न झाला.(Photo Instagram)

लेखनासोबतच प्रवीण तरडेनं या सिनेमाचे दिग्दर्शनही चांगलं केलं आहे. अतिरंजितपणा किंवा मनोरंजक मूल्यांचा अतिवापर करण्याचं टाळल्यानं एक धगधगतं अग्निकुंड पडद्यावर पहायला मिळतं. (Photo Instagram)

यासमयी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. (Photo Instagram)

क्षितीज दातेनं एकनाथ शिंदेंच्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. (Photo Instagram)