मॅक्सिकोमध्ये बोल्ड अंदाजात वावरतीये सोनाली; पुन्हा शेअर केले बिकिनी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:47 PM2022-05-22T12:47:40+5:302022-05-22T12:54:47+5:30

Sonalee kulkarni:सोनालीचे हे फोटो पाहता मराठी कलाविश्वातील बोल्ड अभिनेत्री म्हणूनही सध्या तिच्या नावाची चर्चा सुरु आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत येणारी सोनाली अप्सरा या नावानेही ओळखली जाते.

सोनालीने आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते.

सोनाली तिच्या अभिनयसह वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. यात अनेकदा ती तिच्या पर्सनल लाइफमधील काही घटना, घडामोडी फोटो वा व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते.

सध्या सोनाली तिच्या पतीसह कुणालसह मॅक्सिकोमध्ये तिच्या हनीमुनसाठी गेली आहे. येथील प्रत्येक अपडेट तिने चाहत्यांसह शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनाली सातत्याने तिचे बीचवरील फोटो शेअर करत आहे. यावेळीदेखील तिने असेच काही फोटो शेअर केले आहेत.

सोनालीचे हे फोटो पाहता मराठी कलाविश्वातील बोल्ड अभिनेत्री म्हणूनही सध्या तिच्या नावाची चर्चा सुरु आहे.

सोनालीने गेल्या वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती.

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली आणि कुणालने पुन्हा विधीवत लग्नगाठ बांधली.

पुन्हा कुणालसोबत लग्न केल्यानंतर सोनाली हनीमूनला गेली आहे.