Sonalee Kulkarni : मॅक्सिकोच्या या अलिशान रिसॉर्टमध्ये आहे ‘अप्सरे’चा मुक्काम, एक दिवसाचं भाडं माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:39 PM2022-05-15T17:39:19+5:302022-05-15T17:49:26+5:30

Sonalee Kulkarni Photos: मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या मॅक्सिकोत तिसरा हनिमून साजरा करतेय. या तिसऱ्या हनिमूनचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता सोनालीनं नवे फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या मॅक्सिकोत तिसरा हनिमून साजरा करतेय. होय, या तिसऱ्या हनिमूनचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच.

आता सोनालीनं मॅक्सिकोतील हनिमूनचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनाली ग्लॅमरस लुकमध्ये दिसतेय. एकापेक्षा एक पोझ तिने दिल्या आहेत.

सुंदर समुद्र किना-यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सिकोतील Secrets Maroma Beach Riviera Cancun या अलिशान रिसॉर्टमध्ये सोनाली व तिचा पती कुणाल यांचा मुक्काम आहे. या रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं माहितीये?

या रिसॉर्ट एका दिवसाचं भाडं 1188.39 USD इतकं आहे. भारतीय रूपयांत सांगायचं तर अंदाजे 1 ते सव्वा लाख रूपये. या रिसॉर्टमध्ये दोन दिवस राहणार असाल तर तुम्हाला 2 ते अडीच लाख रूपये मोजावे लागणार.

सोनाली व कुणाल यांनी नुकताच लग्नाचा पहिला वाढदिवस अनोख्या अंदाजात साजरा केला. या दिवशी सोनाली पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा एकदा विधिवत लग्नबंधनात अडकली.

सोनालीने इन्स्टाग्रामवर तिसऱ्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. फोटोत सोनाली मोनोकिनीत मस्तपैकी पोझ देताना दिसतेय. सोनालीच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहतोय.

सोनालीने गतवर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधली होती. गेल्या 7 मेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनालीनं पुन्हा एकदा विधीवत लग्न केलं.

सोनालीचा नवरा कुणाल दुबईत वास्तव्याला असतो. त्याचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या मर्चंट्स टेलर स्कूलमध्ये झालं आहे. कामानिमित्त तो दुबईत स्थायिक झाला आहे.