Golden Beauty! वेस्टर्न ड्रेसमध्ये सई ताम्हणकरने केलं बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 07:04 PM2021-10-08T19:04:36+5:302021-10-08T19:12:20+5:30

SaieTamhankar :छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारी सई आता मोठ्या पडद्यावर चांगलीच रुळली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारी सई आता मोठ्या पडद्यावर चांगलीच रुळली आहे.

स्वबळावर कलाविश्वात नाव कमावणाऱ्या सईने मराठीसोबतच ‘हंटर’, ‘लव्ह-सोनियो’ या सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

आज हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वात सईचा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच सई या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत असते.

सई सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा ती तिचे काही फोटोशूटमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच सईने एक फोटोशूट केलं असून त्यात ती प्रचंड ग्लॅमरस रुपात दिसून येत आहे.

सईने गोल्डन रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

सईने प्रत्येक फोटोसाठी वेगवेगळी पोझ दिली आहे.