Photos : फक्त तू आणि काही नाही..., सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 03:25 PM2022-05-02T15:25:16+5:302022-05-02T15:29:52+5:30

Sai Tamhankar : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.

तिच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सिल्व्हर थाई स्लिट ड्रेसमध्ये सईने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. हा पोशाख तिने खास महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी केला आहे.

सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. फक्त तू आणि काही नाही, अशी एका चाहत्याची कमेंट लक्ष वेधून घेतेय.

फ्लॉवर नहीं फायर है तू, अशी कमेंट एका युजरने सईच्या सौंदर्यचं कौतुक केलं आहे. एकाने तर चक्क आय लव्ह यू सई म्हणत तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज ‘पेट पुराण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पेट पुराण’ ही पाळीव प्राण्यांचे पालनपोषण करण्यावरील उत्साहवर्धक सोशल कॉमेडी सिरीज आहे.६ मे २०२२ रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड व बंगाली या भाषांमध्ये सोनीलिव्हवर सुरू होणार आहे.

काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. तिने फोटो शेअर करत लाइफ पार्टनरबद्दल सांगितले. सई ताम्हणकर हिने फोटो शेअर केलेल्या व्यक्तीचं नाव अनीश जोग आहे.