Marathi Actress Nityakkshi Dyanlakshmi shared pic in village girl look
लय झाक दिसायलीय बे ही मराठमोळी अभिनेत्री, गावरान साडी चोळीतही दिसतेय झक्कास By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 06:30 AM2020-03-09T06:30:00+5:302020-03-09T06:30:00+5:30Join usJoin usNext मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नित्यक्षी ज्ञानलक्ष्मी हिने सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र नुकतेच तिने गावरान अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये नित्याक्षी खूप सुंदर व सोज्वळ दिसते आहे. तिचे साडी व चोळीमध्ये सौंदर्य खुललं आहे. नित्यक्षी सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नित्यक्षी मुळची संगमनेरची आहे. तिने मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने हे बंध रेशमाचे, वृंदावन, मंगळसुत्र, परिजात, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील विविध भूमिकांतून तिने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. मालिकेशिवाय तिने चित्रपटातही काम केले आहे. नगरसेवक एक नायक, वाक्या या चित्रपटात नित्यक्षी झळकली आहे.टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारसोशल मीडियाCelebrityTV CelebritiesSocial Media