किशोरी शहाणेचा नवरा आहे प्रसिद्ध दिग्दर्शक; 'या' चित्रपटामुळे सुरु झाली Lovestory

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:04 AM2021-10-18T11:04:17+5:302021-10-18T11:09:40+5:30

Kishori shahane vij: वयाच्या १७ व्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा नावलौकिक मिळला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे-विज. त्यांचा ‘प्रेम करु या खुल्लम खुल्ला’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्क्रीन शेअर केली होती.

मराठी कलाविश्वामध्ये या चित्रपटाचं स्थान आजही अढळ आहे. याच चित्रपटामुळे मराठी कलाविश्वाला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला.

वयाच्या १७ व्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणाऱ्या किशोरी यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा नावलौकिक मिळला आहे.

मराठी कलाविश्वात दबदबा निर्माण झाल्यानंतर किशोरी यांनी त्यांचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळविला होता.

लाखो जणांची क्रश असलेल्या किशोरीने मात्र, हिंदी कलाविश्वातील एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्नगाठ बांधली आहे.

दिपक बलराज विज असं त्यांच्या पतीचं नाव असून त्यांचं लव्ह मॅरेज आहे. विशेष म्हणजे त्यांची लव्हस्टोरी विशेष आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.

"दीपक यांनी २२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हफ्ता बंद’मध्‍ये जॅकी श्रॉफ हिरो होता आणि त्यावेळी मी मराठी चित्रपटात काम करत होते. तेव्‍हा जॅकीची आणि माझी ओळख महाकाली, होली स्पिरिट हॉस्पिटलमध्‍ये झाली. त्याठिकाणी तो शूटिंगला यायचा. तेव्हा आमच्याच मैत्री वाढली.

एकदा तो मला म्हणाला, ‘एक डायरेक्‍टर है उनको मराठी अॅक्‍ट्रेस चाहिए’. त्यानंतर जॅकीने माझी ओळख दीपक बलराजशी करून दिली." दीपक यांनी मला ‘हफ्ता बंद’ चित्रपटात भूमिका दिली. सेटवर आमची मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात रुपांतर झालं.

दीपक यांच्यामुळेच किशोरींना ‘बॉम्ब ब्लास्ट’ चित्रपटातही काम करायची संधी मिळाली.

‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, आणि ‘सिंदूर’ या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

किशोरी आणि दीपक बलराज यांना एक मुलगा असून त्याचं नाव बॉबी आहे.

‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन मध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.