शरद पोंक्षेंच्या लेकीला कधी पाहिलं आहे का? अभिनय सोडून अन्य क्षेत्रात करते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:37 AM2022-05-18T11:37:56+5:302022-05-18T11:42:33+5:30

Sharad ponkshe: ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने त्यांच्या लेकीची म्हणजेच अपूर्वाची भूमिका साकारली आहे. परंतु, खऱ्या आयुष्यातही शरद पोंक्षे एका मुलीचे वडील आहेत.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि आघाडीचा अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

उत्तम अभिनयासह शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अनेकदा जाहीरपणे एखाद्या विषयावर भाष्य करत त्यांनी त्यांचं मत नोंदवलं आहे. परिणामी, बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

काही वर्षांपूर्वीच त्यांना कर्करोग झाला होता. मात्र, या असाध्य आजारावर मात करत ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. इतकंच नाही तर त्यांन कलाविश्वात पुन्हा कमबॅकही केलं.

सध्या शरद पोंक्षे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत विनायक कानेटकर ही भूमिका साकारत आहेत.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने त्यांच्या लेकीची म्हणजेच अपूर्वाची भूमिका साकारली आहे. परंतु, खऱ्या आयुष्यातही शरद पोंक्षे एका मुलीचे वडील आहेत.

शरद पोंक्षे यांना एक मुलगी असून ती कलाविश्वापासून कोसोदूर असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे ती एका वेगळ्या क्षेत्रात तिचं नशीब आजमावत आहे.

शरद पोंक्षे यांच्या लेकीचं नाव सिद्धी असं असून ती मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असल्याचं सांगण्यात येतं.

शरद पोंक्षे यांची लेक सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र, शरद पोंक्षे अनेकदा तिच्याविषयीच्या पोस्ट शेअर करत असतात.

शरद पोंक्षे यांना कर्करोग झालेला असताना सिद्धीने त्यांची प्रचंड सेवा केली. विशेष म्हणजे दररोज रुग्णालयात ये-जा करुनही ती १२ वीत ८६ टक्के मार्क मिळवत उत्तीर्ण झाली.