कलाविश्वापासून दूर आहे गश्मीर महाजनीची पत्नी; सौंदर्याच्या बाबतीत देते अभिनेत्रींना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 07:00 AM2022-05-17T07:00:00+5:302022-05-17T07:00:02+5:30

Gashmeer mahajani: गश्मीरप्रमाणेच सध्या त्याची पत्नी चर्चेत येत असून तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायम उत्सुक असतात.

मराठी कलाविश्वातील हॅण्डसम हंक म्हणजे गश्मीर महाजनी. ज्येष्ठ अभिनेता रविंद्र महाजनी यांचा लेक असलेल्या गश्मीरने कलाविश्वात त्याचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.

'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' अशा काही निवडक मराठी चित्रपटांमध्ये गश्मीर झळकला आहे.

मराठीसह गश्मीरने 'मुस्कुराके देख जरा' आणि 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या त्याने त्याचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेला गश्मीर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दररोज चाहत्यांच्या भेटीला येत असतो.

बऱ्याचदा गश्मीर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. यात त्याची पत्नी व मुलाची झलक नेटकऱ्यांना पाहायला मिळते.

गश्मीरप्रमाणेच सध्या त्याची पत्नी चर्चेत येत असून तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायम उत्सुक असतात.

गश्मीरने २०१४ मध्ये गौरी देशमुख हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. गौरी व गश्मीर यांचं लव्हमॅरेज आहे.

गौरी आणि गश्मीर या दोघांची कुटुंबामुळे एकमेकांसोबत ओळख झाली होती. या दोघांचेही कुटुंबीय एकमेकांचे फॅमिली फ्रेंड आहेत.

सुरुवातीच्या काळात मैत्री असलेल्या गौरीच्या प्रेमात गश्मीर पडला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गौरी मूळची अमरावतीची असून तिने पुण्यामध्ये मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतल्याचं सांगण्यात येतं.

सध्या गौरी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत असल्याचं म्हटलं जातं.

गश्मीर व गौरी यांना व्योम हा लहान मुलगा असून २०१९ मध्ये त्याचा जन्म झाला आहे. गश्मीर अनेकदा व्योमचे व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.