Independence Day 2020 : सोनाली कुलकर्णीने अनोख्या अंदाजात दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 01:12 PM2020-08-15T13:12:35+5:302020-08-15T13:21:14+5:30

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांना फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतात आज सगळीकडे 74वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतदेखील स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.

स्वातंत्र्य दिना निमित्त कलाकार मंडळी सोशल मीडियावर देशावरील प्रेम व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांना फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने झेंड्याच्या रंगाचे कपडे परिधान करून फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी ती चाहत्यांशी संवाद साधत असते.

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.