आकाश ठोसरचे फोटो पाहून तरुणींचा बदलला मूड, देतायत भन्नाट प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:57 PM2021-10-11T12:57:49+5:302021-10-11T13:05:25+5:30

सैराटनंतर आकाशने काही सिनेमे वेबसिरीजमध्येही काम केले. त्याचदरम्यान त्याने स्वतःवरही प्रचंड मेहनत घेतली. म्हणून एक डॅशिंग अवतारात आकाशने अभिनयाप्रमाणे त्याच्या लूकमुळेही चाहत्यांची पसंती मिळवली होती.

सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत.

आकाश ठोसरनेही खुप मेहनत घेत डोले शोलेही बनवलेत.

पिळदार शरीरयष्टीसह तो पुन्हा चाहत्यांसमोर आला आणि तरुणींच्या काळजाचा ठोकाच चुकला.

आकाशचा प्रत्येक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

वेगवेगळ्या अंदाजातील फोटो तो चाहत्यांसह शेअर करत असतो.

नुकतेच शेअर केलेल्या फोटोंवरही चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

डॅशिंग लूक. रॉकिंग अंदाज, हटके हेअर स्टाइल यामुळे आकाश सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे.

फोटोवर तरुणी फुल ऑन फिदा झाल्याचे पाहायला मिळतंय.

'सैराट'पासून सुरु झालेला त्याचा कलाविश्वातील हा प्रवास सध्या कमालीच्या वेगानं पुढे जात आहे.