मुक्ता बर्वेच्या आईला पाहिलंत का?, फोटो शेअर करत म्हणाली - 'जिनं मला जन्म दिला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 11:54 AM2022-06-25T11:54:10+5:302022-06-25T12:05:03+5:30

Mukta Barve in 'Y' Cinema : 'वाय' या सिनेमात मुक्ता बर्वेने महत्त्वपूर्ण आणि वास्तववादी भूमिका साकारली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. आता ती लवकरच एका वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला आली आहे.

मुक्ताच्या वाय या चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा झाली होती.

अखेर हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात मुक्ताच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली असून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान आता मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने इंस्टाग्रामवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत म्हणाले की, जिने मला जन्म दिला आणि स्वाभिमानानी जगण्याची ताकद दिली, तिचाही आमच्या ‘ती’ त्या लढ्याला पाठिंबा . (आज पुण्यातल्या सगळ्या थिएटर्स मध्ये आमची सगळी टीम येते आहे)

मुक्ता बर्वे हिने शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळतंय की, मुक्ताप्रमाणे तिच्या आईनेदेखील वाय लिहिलेले टीशर्ट घातले आहे. दोघींनी हाताने वायचे चिन्ह बनवले आहे. मुक्ताच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित वाय या सिनेमात मुक्ताने महत्त्वपूर्ण आणि वास्तववादी भूमिका साकारली आहे.

आजवर मुक्ताने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकली. त्याचप्रमाणे वाय या चित्रपटातील तिची भूमिकादेखील लक्षवेधी ठरली आहे.

विशेष म्हणजे हा सिनेमा प्रदर्शित होऊन काही तास होत नाहीत तर मुक्तावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुक्ताचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

मुक्ताशिवाय वाय चित्रपटात प्राजक्ता माळी, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, ओमकार गोवर्धन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.