सोनाली कुलकर्णीला नाही तर पत्रकार व्हायचे होते, यासाठी अप्सरेने घेतली पुण्याच्या कॉलेजमधून डिग्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:53 PM2022-05-18T16:53:15+5:302022-05-18T19:36:31+5:30

Sonalee Kulkarni 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज 34वा वाढदिवस आहे. (Photo Instagram)

सोनाली कुलकर्णीनं लग्नाचा पहिला वाढदिवस 7 मे 2022 झाला. या दिवशी सोनालीने पती कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.(Photo Instagram)

दुसऱ्या लग्नानंतर सोनाली आणि कुणाल तिसऱ्या हनीमूनसाठी मॅक्सिकोमध्ये गेले आहेत. तिथले फोटो सोनालीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(Photo Instagram)

सोनाली कुलकर्णी हिचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यातील लष्करी छावणीमध्ये झाला. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांनी सैन्याच्या वैद्यकीय दलात 30 वर्षे काम केल आहे. तिची आई सविंदर ही पंजाबी असल्यामुळे तिच्या बोलण्यातून या भाषेचा ठेहराव दिसतो. (Photo Instagram)

सोनालीचे प्राथमिक शिक्षण आर्मी विद्यालयात झाले असून माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तिने पु्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पत्रकारिता विषयातील पदवी प्राप्त केली आहे. पुण्याच्याच इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट ह्या संस्थेतून तिने पत्रकारितेमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. (Photo Instagram)

सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Instagram)

सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. (Photo Instagram)

त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. (Photo Instagram)

यानंतर तिने क्षणभर विश्रांती, अजिंठा(चित्रपट) आणि झपाटलेला 2 यांसारखे अनेक चित्रपट केले.(Photo Instagram)

सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली. .(Photo Instagram)